मुंबई: राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Election) महत्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. काल महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला १३ अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती, तर सपाचे नेते अबू आझमी नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर आमदार अबू आझमी यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला आणखी दोन आमदारांचे बळ मिळणार आहे. (Rajya Sabha Elections)
काल महाविकास आघाडीच्या मुंबईतीला बैठकीला अपक्ष १३ आमदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीला सपाचे आमदार उपस्थित नव्हते, त्यामुळे सपाचे आमदार नेमके कोणाला मत देणार या चर्चा सुरू झाल्या होत्या. सपाचे नेते अबू आझमी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. अबू आझमी यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी (Election) आता सपाचे आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समर्थन देणार आहेत. सपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून, त्याची लवकरच अंमलबजावणी देखील करणार असल्याचे अबू आझमी यांनी माहिती दिली. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेला सहकार्य करणार असल्याचेही, अबू आझमी म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर काल मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला १३ अपक्ष आमदारांची उपस्थिती होती.
२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.