भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला शिवाजी पार्कमध्ये सुरुवात झाली आहे. या सभेला इंडिया आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. उद्धव ठाकरे, एम.के स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव आणि के. सी. वेणुगोपाल या सभेला हजार आहे. मात्र अखिलेश यादव हे या सभेत गैरहजर दिसले.
सभेला अखिलेश यांच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चला उधाण आलं होतं. मात्र आता त्यांनी स्वतः सभेला गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने 20 मार्चपासून उत्तर प्रदेशमध्ये नामांकनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्यामुळे मी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, एक निवेदन प्रसिद्ध करून ते असं म्हणाल आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पक्षाच्या ट्विटर अकाउंटवर हे निवेदन ट्वीट करण्यात आलं आहे. याद्वारे अखिलेश यादव म्हणाले आहेत की, ''आज मुंबईत तुमच्या (राहुल गांधी त्यांच्या) भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. असे काम करणारे फार कमी लोक असतात. तुमच्या निर्धारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ही आग तुम्ही मणिपूरपासून सुरू केली, जी भाजप सरकारच्या अपयशामुळे धगधगत आहे. ईशान्येतून तुम्ही हुकूमशाही सरकारविरोधात जोरदार संदेश दिला.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''या संपूर्ण काळात तुम्ही शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठांसह समाजातील प्रत्येक घटकाला भेटून त्यांच्या समस्या समोर आणल्या. निवडणूक आयोगाने काल निवडणुका जाहीर केल्या, 20 मार्चपासून यूपीमध्ये नामांकन सुरू होत आहेत. त्या तयारीमुळे मी यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही.''
ते पुढे म्हणाले, ''शेतकरी, तरुण, मागास, दलित आणि महिला विरोधी असलेल्या भाजपला जनता या निवडणुकीत उखडून टाकेल, अशी आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर यातच या यात्रेचे खरे यश असेल.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.