Maharashtra Politics : एकही खासदार नसताना मी केंद्रीय मंत्री, मात्र वंचितचा मविआमध्ये अपमान: रामदास आठवले

Ramdas Athawale News: 'वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे: रामदास आठवले
Ramdas Athawale On Prakash Ambedkar
Ramdas Athawale On Prakash AmbedkarSaam Tv

>> पराग ढोबळे

Ramdas Athawale On Prakash Ambedkar:

''वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे. त्यांचा अपमान होत आहे'', असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. त्यांना सन्मानजनक जागा मिळत असेल तर त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही. पण ते जातील असं वाटत नाहीये.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ramdas Athawale On Prakash Ambedkar
Maharashtra Politics: 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', राहुल गांधींच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

रामदास आठवले म्हणाले, ''मी एनडीएमध्ये आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं. एकही जागा नाही मिळाल्याने मी त्यांना सोडणार नाही. लगेच सोडण्याचा विचार होत नाही.'' (Latest Marathi News)

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणले, ''राहुल गांधी चैत्यभूमीवर जाऊन आले. त्यासाठी त्यांचे आभार. राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये मोठी गर्दी होती, मात्र गर्दी मतांमध्ये परिवर्तन होत नाही. राहुल गांधी हे गावात आले म्हणून त्यांना बघण्यासाठी जातात. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा व्हायच्या. पण मतांमध्ये रूपांतर होत नव्हतं. सभा मोठी असली तरी त्यांना फार यश मिळेल, असं वाटत नाही.''

Ramdas Athawale On Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल, 2 जूनला जाहीर होणार निकाल; काय आहे कारण?

एनडीएच्या जागावाटपाबद्दल बोलताना आठवले म्हणाले, ''रिपब्लिकन एनडीएमध्ये असल्यामुळे आम्हाला सोलापूर आणि शिर्डीच्या जागा मिळावी, अशी मागणी आहे. रिपब्लिकन छोटा पक्ष असला तरी. भाजप नेत्याना भेटलो आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडासोबत आहे. शिंदे गटाचे तिथे खासदार आहे, मला संधी दिली तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये फायदा होईल. महाराष्ट्रातील सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळाला नाही. अजित दादांचा विस्तार झाला, मात्र आमचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद द्यावं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com