नितीन राऊत । Nitin Raut  SaamTv News
मुंबई/पुणे

दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीच चौकशी करणार : ऊर्जामंत्री

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ऊर्जामंत्री 'ऍक्शन मोड' मध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रश्मी पुराणिक

मुंबई : दक्षिण मुंबई (South Mumbai) वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत (Nitin Raut) यांनी 'ऍक्शन मोड' मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते.

हे देखील पहा :

या घटनेची माहिती मिळताच राऊत हे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी संपर्कात होते. वीज (Electricity) पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी ऊर्जामंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या. टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईतील वीज पुरवठ्यामध्ये विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात पूर्ववत करण्यात आला, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT