Police investigate the crime scene after a man allegedly killed his father and brother over a marriage dispute in Junnar. saam tv
मुंबई/पुणे

लग्न लावून देत नाही म्हणून पोटच्या मुलाने केली बाप आणि सख्या भावाची निर्घृण हत्या

Son Kills Father And Brother Over Marriage Dispute In Junnar: जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना; लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलाने झोपेत असलेल्या वडील आणि सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका तरुणाने झोपेत असेलल्या आपल्या वृद्ध वडिलांची आणि सख्ख्या भावाची दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला काहीवेळातच ताब्यात घेतले.

वडील आणि भाऊ जागीच ठार

पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीतील बगाडवाडी येथे ही थरारक घटना घडली. येथील लक्ष्मण गोविंद कदम यांच्या शेतातील एका पत्राशेडमध्य मुकणे कुटुंब राहत होते.

मृतकांची नावे: जयराम महादू मुकणे (वय 60 वर्ष वडील), राजू जयराम मुकणे( वय 27 वर्ष, भाऊ)

आरोपीचे नाव: बाबजी जयराम मुकणे(वय 32 वर्ष)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाबजी मुकणे याचे लग्न ठरत नसल्याने किंवा घरचे लग्न लावून देत नसल्याने तो काही दिवसांपासून संतापात होता. याच कारणावरून बुधवारी पहाटेच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना मुलगा बाबजीने वडील जयराम आणि भाऊ राजू यांच्यावर लाकडी चोपणीने जबर हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्यांच्या डोक्यात दगड घालूनही दोघांनाही जागीच ठार केले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला.

या घटनेबाबत मृत जयराम यांचा तिसरा मुलगा युवराज जयराम मुकणे (वय २७) याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबजी मुकणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) (खून) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे कौटुंबिक वादातून गुन्हेगारी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा भीषण चेहरा समोर आला असून जुन्नर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT