Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

...म्हणून ठाकरे-पवार हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करत नाहीत; सोमय्यांचा गंभीर आरोप

'दापोली कोर्टात पुरावे दिले आहेत त्यामुळे अनिल परब यांनी बॅग भरावी'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. 'राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या १०० कोटीहून अधिक बेनामी प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे अशी मागणी करण्यात आलीय हे पैसे कुठून आली यांची चौकशी झाली पाहिजे, हा पैसा भ्रष्टाचाराचा आहे, यांची चौकशी पवार ठाकरे यांनी का केली नाही,' असे अनेक सवाल सोमय्यांनी उपस्थित केले.

तसंच हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू झाली पाहिजे मात्र, याबाबत ठाकरे पवार कारवाई करणार नाहीत कारण हे परिवार स्वतःच घोटाळेबाज आहेत त्यामुळे एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला मदत करत असल्याचा गंभीर आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.

पुण्यातील कोविड सेंटर मध्ये घोटाळा झाला संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जवळच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे. शरद पवार यांच्याकडून झेंडे घेऊन आलेल्या लोकांना भेटलो असतो अन् सांगितले असते की हसन मुश्रीफ यांच्याविरोधात काही असेल तर ते द्या; ठाकरे पवार नौटंकी करतात, लक्ष विचलित केलं जातंय, अनिल परब चौकशी सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भ्रमनिरास करत आहेत की जप्ती आली म्हणजे कारखाना बंद होणार नाही, पण आता अजित पवार याच्यापेक्षा शेतकऱ्यांकडे जाईल असं सांगत, अनिल परब याचा आटोमॅटिक नंबर आला आहे, अनिल परब खोटारडे मंत्री आहेत, दापोली कोर्टात पुरावे दिले आहेत त्यामुळे अनिल परब यांनी बॅग भरावी असा इशाराच सोमय्यांनी यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT