Lohgad Case saam tv
मुंबई/पुणे

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

केतान अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा परिसरात घडलेल्या घटनेबाबत नवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली असून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता रोज नवे खुलासे समोर येत आहेत. १८ जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. दोघांकडून सुरू असलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड होतेय. अशातच घटनास्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक महत्त्वाची माहिती समोर आणलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, सियाने केतनला गडावरून ढकलल्यानंतर ती मोठ्याने ओरडू लागली. केतन खाली पडल्याचे तिने तिथल्या इतर पर्यटकांना सांगितलं. ही माहिती गडावर तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचताच कर्तव्यावर असलेले राहुल नावाचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. त्यावेळी सिया तिथे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. मात्र, तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिने केतन फोटो काढत असताना गडावरून खाली पडल्याचे सांगितले.

यानंतर पोलिसांनी सियाला वरच थांबण्यास सांगितलं आणि स्वतः केतनचा शोध घेण्यासाठी खाली उतरले. काही वेळाने ते केतनजवळ पोहोचले असता तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यावेळी केतनचा मृत्यू झाल्याचं पोलीस कर्मचारी राहुल यांच्या लक्षात आलं. मात्र वर परतल्यानंतर सियाला धक्का बसू नये आणि तिला धीर मिळावा म्हणून त्यांनी तिला "केतन जिवंत आहे" असं सांगितलं.

दिलासा मिळण्याऐवजी सिया घाबरली

पोलिसांनी दिलेली ही माहिती ऐकून सियाला दिलासा मिळण्याऐवजी ती आणखी घाबरल्याचे राहुल यांनी सांगितलं. घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेल्या राहुल यांनी केलेला हा खुलासा सध्या चर्चेचा विषय ठरतोय.यासंदर्भातील बातमी 'झी न्यूज'ने दिली. या प्रकरणात सध्या पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांचीही पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

चेतन आणि सियाच्या प्रेमसंबंधांची सुरुवात कशी झाली?

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील एका वर्षापासून ते प्रेमसंबंधात होते. दोघांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची जवळीक वाढत गेली.

दरम्यान, सियाने पुण्यात बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाच्या निमित्ताने चेतन आणि सिया यांचा एकमेकांशी अधिक संपर्क वाढला. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT