Mumbai Pune Accident: मुंबई- पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू...(पहा Video) दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Mumbai Pune Accident: मुंबई- पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू...(पहा Video)

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरती भीषण अपघात झाला आहे.

दिलीप कांबळे

पुणे: मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरती भीषण अपघात (Mumbai Pune Expressway) झाला आहे. ६ गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात (Khopoli) झाला आहे.

पहा व्हिडिओ-

कार, कंटेनरसह ४ वाहनांचा भीषण आणि विचित्र अपघात (Accident) झाला आहे. २ कंटेनरच्या (container) मधोमध कार अडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ४ जणांचा जागीच मत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत आणि ५ किरकोळ जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

जखमींना पनवेलच्या (Panvel) एम जी एम रूग्णालयामध्ये (hospital) हलविण्यात आले आहे. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस (Police) दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एकूण ६ गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे.

यामध्ये २ कंटेनर, एक वेन्यू कार, एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि एका स्विफ्ट गाडीचा समावेश आहे. या अपघातात वेन्यू कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप या अपघाताचे नेमकं कारण समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT