रश्मी पुराणिक
मुंबई: आम्ही सहन केले आता बघाच, असा निर्वाणीचा इशारा खासदार संजय राऊत देत, साडेतीन लोकांना आत टाकणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पस्ट केल्यानंतर संजय राऊत यांच्या रडारवर भाजपचे ते साडे तीन नेते कोण असा सवाल उपस्थित होत आहे. साडेतीन नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे देखील पहा-
फडणवीस टार्गेटवर?
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती लपवल्या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आता फडणवीस यांचे प्रकरण देखील त्याच स्वरुपाचे आहे. न्यायालयाच्या निकालावर ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. थेट फडणवीसांना या प्रकरणात गोत्यात आणले जाईल असे बोलले जात आहे. किंवा फडणवीस यांचे भाऊ यांच्यावरही आरोप होऊ शकतात
मुंबई बँक गैरव्यवहारावरून दरेकर अडचणीत?
मुंबै बॅंक गैरव्यवहार मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकर सध्या अडचणीत आहेत. त्यातच मुंबई बँकेत मजूर म्हणून त्यांनी लढवलेल्या निवडणुकामुळे ते पुरते अडचणीत असताना आता हे प्रकरण आता औद्योगिक न्यायालयाच्या कोर्टात प्रलंबित आहेत. हा मुद्दा तापवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाड या मुळे अडचणीत?
प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगर पालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 2014 मध्ये या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा घोटाळा असल्याने हे प्रकरण पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.