Mumbai Pune Expressway Special Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल ६ तासांचा ब्लॉक; कधी अन् केव्हा? सविस्तर वाचा...

Pune-Mumbai Expressway Traffic Block: पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी गुरुवारी (१८ जानेवारी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

Mumbai Pune Expressway Special Block

तुम्ही जर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी गुरुवारी (१८ जानेवारी) एक्स्प्रेस वेवर तब्बल ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत महामार्गावर हलक्या तसेच अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे महामार्गावरून (Mumbai Pune Expressway) पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी हलकी वाहने मुंबई लेन किमी ५५ वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ या मार्गावरून मार्गस्त होतील.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बस तसेच इतर हलकी वाहने मुंबई लेन किमी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.

त्याचबरोबर खालापूर टोल नाका शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी. ३२.५०० येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील.

त्याचबरोबर पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT