मावळ : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी मतदानाच्या टप्प्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राजकीय नेते मंडळींना उमेदवारीचा अर्ज दाखल करताना संपत्ती जाहीर करावी लागते. अशात महायुतीचे मावळमधील श्रीरंग बारणे यांनीही सोमवारी उमेदावारीचा अर्ज भरला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबीयांची संपत्तीविषयीची माहिती समोर आली आहे.
श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबीयांची एकत्रित संपत्ती २५० कोटी रुपये असल्याची माहिती हाती आली आहे. मागील पाच वर्षात बारणे यांच्या संपत्तीत एकूण ३० कोटींची वाढ झाली आहे. बारणे यांच्याकडे सोन्याचे आणि हिऱ्यांचे 50 लाखांहून अधिकचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे 182 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर 15 कोटींची जंगम मालमत्ता आहे. दीड कोटींची आलिशान वाहने देखील आहेत. तर बारणे यांच्यावर 85 लाखांचे कर्ज आहे.
शेती, बांधकाम व्यवसाय खासदारकीचे मानधन, वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता आणि ब्रिक्स फॅक्टरीच्या माध्यमातून ही संपत्ती मिळविल्याची बारणे यांचा दावा आहे.
श्रीरंग बारणे हे २०१९ साली दहावी नापास होते. त्यानंतर मार्च २०२२ ला दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यावर दोन गुन्हे कोर्टात प्रलंबित आहेत. २००९ मध्ये आमदारकी आणि २०१९ मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याबद्दल २०२१ मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. सध्या कोर्टात तपास सुरु आहे. तर बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी दुसरा गुन्हा नोंद झाला. दुसरा गुन्हा हा खेड न्यायालयात प्रलंबित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.