Shri Dolasnath Maharaj's Yatra begins in Talegaon
Shri Dolasnath Maharaj's Yatra begins in Talegaon दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Maval: तळेगावमध्ये श्री डोळसनाथ महाराज यांच्या यात्रेला सुरुवात

दिलीप कांबळे

पुणे: मावळमधील तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याचा उत्सव दोन ते चार एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना संक्रमणाचा प्रर्दुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या नियमाला अधीन राहून उत्सव साजरा केला होता. या वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. तब्बल दोन वर्षानंतर गावातील यात्रा होत असल्याने आणि त्यातच निर्बध हटवल्यामुळे गावातील लोकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. (Shri Dolasnath Maharaj's Yatra begins in Talegaon)

हे देखील पहा -

तळेगावमधील (Maval) डोळसनाथ महाराज मंदिरात भक्तानी दर्शनसाठी गर्दी केली आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठी एकून पाच लाख पाच हजार 555 रुपयापर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा, शिवप्रतिमा आदि रोख बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. दरम्यान श्री डोळसनाथ महाराज यांचे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. याचा जीर्णोद्धार सरसेननी उमाजी राजे दाभाडे सरकार यांनी केला होता, मात्र यालाही शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT