Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Rashi Bhavishya Today 29 April 2024: आजचे राशिभविष्य, २९ एप्रिल २०२४:'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...
Horoscope Today 29 April 2024
Horoscope Today 29 April 2024Saam Tv

मेष: विरोधकांपासून सावध राहा.

आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा चढ उताराचा असेल. व्यवसायातील भागीदारीत तुमचा विश्वासघात करू शकतो. तुमच्या घरात नवीन पाहुणे येऊ शकतात. विरोधकांपासून सावध राहा.

वृषभ: कोणालाही वचन देऊ नका.

आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणी आणू शकतो. तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल, तर जोडीदाराचा सल्ला घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणालाही वचन देऊ नका.

मिथुन: उधार दिलेले पैसे परत मिळतील.

आज तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. वाहने जरा जपूनच चालवा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. लग्नाचा योग जुळून येईल.

कर्क: आज तुम्ही काहीतरी खास कराल.

आज तुम्ही काहीतरी खास कराल. तुमच्या घरी काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. कामाबाबत काही योजना बनवाव्या लागतील.

Horoscope Today 29 April 2024
Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

सिंह: विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाईल. करिअरमधील प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात चांगली तेजी दिसेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगला दिवस. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.

कन्या: व्यवसायात चांगला नफा मिळेल.

आज तुमच्या व्यवसायातील योजना पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी चांगले असेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

तूळ: काम जरा सावधगिरीने करा.

आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. तुम्ही तुमचे काम जरा सावधगिरीने करा, अन्यथा त्यात काही अडथळे आल्याने तुम्ही त्रस्त राहाल. कामाच्या दिशेने तुमचे काही नवीन प्रयत्न फळ देतील.

वृश्चिक: नोकरीचा योग जुळून येईल.

आज तुम्ही सहलीला जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा मोकळा वेळ इकडे तिकडे घालवू नका. नोकरीचा योग जुळून येईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल.

धनु: कोणताही धोका पत्कारणे टाळा.

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन योजना बनवण्यासाठी चांगला असेल. आज कोणताही धोका पत्कारणे टाळा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते. कोणतेही काम करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा.

मकर: आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असेल. परीक्षेत यश मिळाल्यास विद्यार्थ्यांचे मनोबल आणखी वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते.

कुंभ: आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात.

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुम्हाला अनोळखी लोकांपासून अंतर राखावे लागेल, अन्यथा ते तुमचे काही नुकसान करू शकतात.

मीन: सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळेल.

आजचा दिवस तुमच्यासाठी पैशाशी संबंधित बाबींमध्ये चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळेल. एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर ती करा. विवाहाचा योग जुळून आल्यामुळे वातावरण आनंददायी राहील.

Horoscope Today 29 April 2024
WhatsApp News : या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन, वेळीच थांबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com