गुढीपाडव्याचा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील 'सोनेरी क्षण'

आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे.
Agriculture News Parbhani
Agriculture News ParbhaniSaam Tv

परभणी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर सालगडी बारा महिन्याकरिता घेतात.

गुढी पाडवा येण्यापूर्वीचा सालगड्याचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो सालगडी आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. सालगडी आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन सालगडी ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच.

हे देखील पहा -

कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती व कोरोनाचा सामना करत तंग धरली,गेल्या वर्षी खरिपात नैसर्गिक आपत्तीला तोड दिले पारंपरिक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला, गेल्या वर्षी जो सालगडी 75 ते 80हजार घेत होता तो लाख रुपये ह्या वर्षी मागत असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. सालाला नवीन तास घालत नांगरणी करतात व खरिपासाठी जमिनीच्या मशागतीची तयारी सुरू होते.

Agriculture News Parbhani
'समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता द्या'; संसदेत सुप्रिया सुळेंनी मांडले विधेयक

बदलत्या काळानुसार सालगड्याला देण्यात येणारी चंदी (धान्य) बंद झाले असून नगदी पैशावर व्यवहार सुरू आहेत. अश्यातच महागाई वाढली आहे व पैसे देऊनच सालगड्याला अन्नधान्य खरेदी करावे लागत असल्याने सालगडी पैसे वाढवून मागत आहे. दरवर्षी कोणते ना कोणत्या संकटाला शेतकरी सामोरी जात शेती करत आहे. अश्यातच पाडव्याला सालगडी काय मागतो ह्याची पण चिंता असतेच, शेतीत पिकले नाही तरी सालगड्याला ठरलेले पैसे द्यावेच लागतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com