Shraddha Walker Case Update Saam TV
मुंबई/पुणे

Shraddha Walkar : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; आरोपी आफताबचा आणखी एक धक्कादायक खुलासा

पोलीस चौकशीत आफताब दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे करीत आहे. आता आफताबने आणखी एक धक्कादायक खुलासा केला.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस चौकशीत आफताब दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे करीत आहे. आता आफताबने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आरोपीने ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा जाळला सुद्धा जाळल्याची कबुली दिली.  (Latest Marathi News)

आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या (Crime News) करण्यासाठी इंटरनेटवरून माहिती जमा केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यास 10 तास लागल्याचं आफताबने पोलिसांना सांगितलं. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे त्याने पाण्याने धुतले. या दहा तासांदरम्यान थकवा आल्यावर त्याने विश्रांतीही घेतली. त्याने बिअर आणि सिगारेट प्यायली.

आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याने ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. यानंतर त्याने नेटफ्लिक्सवर चित्रपटही पाहिला. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिचा चेहरा जाळला. एवढेच नाही तर हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवरही बऱ्याच गोष्टी सर्च केल्याची कबुलीही त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

खून केल्यानंतर जमिनीवरील रक्ताचे डाग साफ करण्यासाठी त्याने केमिकल आणि ब्लीच पावडरचा वापर केला होता. पुरावे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ब्लीच पावडरचा वापर केला. याशिवाय जमिनीवर रक्ताचा एक डागही राहू नये म्हणून केमिकलचा वापर केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहनात श्रद्धाचे कपडे फेकले गेले होते. त्याची ओळख पटली आहे. डस्टबिनचा कचरा जिथे टाकला जातो. अशा दोन जागा पोलिसांनी ओळखल्या आहेत. त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT