kurla Saam
मुंबई/पुणे

Shocking: लोकल पकडायला धावला अन् गटारीत पडला, कुर्ला स्टेशनवरील भयंकर व्हिडिओ

Viral Video of Man Falling on Railway Tracks: लोकलच्या अपघाताचे थरकाप उडवणारे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर रूळ ओलांडत असतानाचा एकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

दररोज लाखो प्रवासी लोकलवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येकाला लोकल पकडण्याची घाई असते. आणि या घाईपायी अनेकदा काही प्रवासी शॉर्टकटचा मार्ग निवडतात. रुळ ओलांडणं, चालत्या ट्रेनमध्ये चढणं, हे सगळं आयुष्याशी खेळण्यासारखं आहे. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना नुकतीच कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडली. रूळ ओलांडत असताना एकाचा पाय अडकतो आणि पडतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे. मात्र, त्याचा पाय अडकतो आणि रूळावर पडतो. तो व्यक्ती दोन ट्रॅकच्यामध्ये असलेल्या गटारात उलटा पडलेला दिसत आहे. रूळावर पडलेला पाहून काहींनी रूळावर धाव घेतली. तसेच जखमी व्यक्तीला बाहेर काढलं.

गटारातील पाण्यात रक्त मिसळलेलं स्पष्ट दिसत आहे. त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा व्यक्ती नक्की रूळ ओलांडताना पडला की ट्रेनमधून खाली पडला, याचा तपास सुरू आहे. त्या ठिकणी त्वरीत ट्रेन आली नसल्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

‘फक्त २ मिनिटं वाचवण्यासाठी’ आयुष्य घालवायचं का?

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी संबंधित व्यक्तीबद्दल हळहळ व्यक्त केली आहे, तर अनेकांनी त्या व्यक्तीला खडसावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT