Ketan Agarwal Case  saam tv
मुंबई/पुणे

Ketan Agarwal Case: 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं', सियाची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Shocking Twist in Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात त्याची होणारी बायको सिया गोयलने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली. केतनची हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय ते तिने सांगितले.

Priya More
  • सिया गोयलने केतनची हत्या करणे लग्न मोडण्यापेक्षा सोपे वाटल्याची कबुली दिली

  • सिया आणि चेतनवर केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

  • तपासात राजस्थान ट्रिप आणि जुने प्रेमसंबंध समोर आले

  • पोलिसांनी आज सियाच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवून घेतला

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनची होणारी बायको सिया गोयलने त्याच्या हत्याप्रकरणात धक्कादायक कबुली दिली. 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले' सियाने पोलिस चौकशीदरम्यान कबुली दिली. नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न मोडल्यास कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील, असे सियाने सांगितले. लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या नवऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सियाने पोलिसांना चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

केतनशी लग्न करायचे नसल्याने प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून कट रचल्याचा दोघांवर आरोप आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून विविध पैलूंवर तपास सुरू आहे. या हत्याकांड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने राजस्थान ट्रिप केली होती. फेब्रुवारीमध्ये ठरलेल्या लग्नापूर्वी चेतन आणि सिया त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत या ट्रिपवर गेले होते.

सिया आणि चेतन या दोघांनी राजस्थानमधील उदयपूर, जोधपूर सारख्या शहरांचा दौरा केला होता. ७ दिवसांचा दौऱ्यात पंच तारांकित हॉटेलमध्ये दोघांनी मुक्काम केला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे. चेतन चौधरी हा मूळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सियाने चेतनच्या मित्रांसोबत मेहरनगढची सुद्धा सफर केली होती.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्याकांड आतापर्यंत पोलिसांकडून १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शुक्रवारी सियाचा भाऊ साहिलची पोलिसांनी सखोल चौकशी केली होती. तर आज सियाचे आई-वडील यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून ७ तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले. या चौकशीचे नेतृत्व लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत असून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांना ९ प्रश्न विचारले होते. याची त्यांनी नेमकी काय उत्तरं दिली याची माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT