Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: 'पबजी' खेळण्याच्या नादात गोळीबार, तरुणाच्या पायातून आरपार गेली गोळी; पुण्यात खळबळ

Pune Police: पुण्यामध्ये पबजी खेळण्याच्या नादात तरुणाच्या हातात असलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी या तरुणाच्या मित्राच्या पायात घुसली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

'पबजी' खेळता खेळता तरुणाकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात मित्राकडूनच गोळी सुटली. गोळीबारात मित्राच्या पायात गोळी लागली. पुण्यातील उत्तमनगर भागात काल रात्री उशिरा ही घटना घडली. उत्तमनगर भागात तरुणाकडून पिस्तूल लोड अनलोड करताना अचानक गोळी सुटली आणि भयंकर घटना घडली. गोळीबाराच्या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं.

उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उत्तमनगर परिसरात ५ तरुण हे त्यांच्यापैकी असलेल्या एकाच्या घरात बसून "पबजी" मोबाईल गेम खेळत होते. दरम्यान, यातील एकाने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि तो इतर मित्रांना दाखवायला लागला. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हे पिस्तूल लोड अनलोड करण्याच्या नादात यातील एकाच्या हातातून पिस्तुलातून गोळी बाहेर पडली आणि थेट समोर बसलेल्या मित्राच्या पायाला लागली.

एकमेकांच्या जवळ बसल्याने पिस्तूलमधून सुटलेली गोळी त्या तरुणाच्या पायाच्या नडगीतून आरपार गेली. या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला. ही सगळी घटना कोणाला कळू नये म्हणून या मित्रांनी एक बनाव केला. जखमी झालेल्या तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर गोळीबार झाला असल्याची खोटी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उत्तमनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तपास आणि चौकशी करत असताना पोलिसांना या तरुणांवर संशय आला. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच या तरुणांनी घडलेला खरा प्रसंग सांगितला. उत्तमनगर पोलिसांनी या तरुणांपैकी एकाकडे असलेले पिस्तूल जप्त केले असून या सर्व ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उत्तमनगर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT