Junnar MLA Atul Benke public support for Ajit Pawar group Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Group: शरद पवार गटाला मोठा धक्का, आणखी एका आमदाराने अजित पवार गटाला दिला पाठिंबा

Junnar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भुमिका घेतली होती. मात्र आता त्यांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

रोहिदास गाडगे

Junnar MLA Atul Benke public support for Ajit Pawar group:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भुमिका घेतली होती. मात्र आता त्यांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर करत अजित पवारांचा झेंडा जुन्नरमध्ये ढोलाने फडकवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अतुल बेनके यावेळी बोलताना म्हणाल आहेत की, जुन्नर तालुक्यात अजित पवारांमुळे विकासकामे झाली. जुन्नर तालुक्यात पायभुत सुविधा उभं करण्याचे यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वल्लभ बेनके यांनी केलं. त्यानंतर अजीत पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी केलं. (Latest Marathi News)

ते म्हणाले, अजित पवार कामाचा आणि प्रश्न सोडविणारा माणूस आहे. राज्यात अनेक युती आणि आघाडी होतात. कांदा निर्यातबंदी शेतकरी विरोधात निर्णय झाला. शेतकऱ्यांना धिर द्यायचे काम अजित पवार करतील.

अतुल बेनके म्हणाले, बिबट्याला भक्ष मिळत नसल्याने माणसांवर हल्ले होत आहेत. पुढच्या काळात माणसांपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त होईल. बिबट्याचा बंदोबस्त वेळीच करायला हवा. दिवसा वीज मिळावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. फक्त जुन्नरचा प्रश्न नाही तर, आंबेगाव शिरुरची हिच परिस्थिती आहे.

दरम्यान, अतुल बेनके यांची साथ मिळाल्याने जुन्नरमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. याचा फायदा अजित पवार गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार का? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT