Beed  Saam tv
मुंबई/पुणे

Beed : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार; टोलनाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला बेदम मारहाण

beed crime news : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. टोलनाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मांजरसुंबा रोडवरील टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबीयांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने पाटोदा पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केल्याचा आरोप

टोल नाक्यावर यापूर्वी अनेकांना मारहाण.. यापूर्वी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या पाटोदा ते मांजरसुंबा रोडवर असलेल्या वैद्यकीय टोल नाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला रोड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण केल्याची घटना रात्री घडली. वीस ते पंचवीस जणांच्या टोक्याने ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या टोल नाक्यावर यापूर्वी देखील मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत.

महाराणीच्या घटनेनंतर सदर कुटुंबीयांनी पाटोदा पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. आता या मारहाणीतील जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाण करणारे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यावर मोर्चा काढत निवेदन दिले.. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा देखील इशारा या नातेवाईकांनी दिला आहे. पाटोदा पोलिसांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून तरी तक्रार घेतली नाही, या आरोपींना राजकीय वरदहस्त आहे, असा देखील आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

तत्पूर्वी, टोल नाक्यावर यापूर्वी देखील मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात तरुणांना एकत्रित करत मारहाण केली जात असल्याचा यापूर्वीचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.. त्याच पद्धतीने रात्री देखील मारहाण केल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salbardi: भय आणि भ्रमाच्या विळखा अन् अनपेक्षित घटना; 'सालबर्डी'चा थरार लवकरच येणार प्रेक्षकांसमोर

Railway-Truck Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन आणि ट्रकची जोरदार टक्कर, बाईकचा चुराडा, Video व्हायरल

Kundan Jewellery Set: नववधूसाठी कुंदन ज्वेलरीचे 5 लेटेस्ट पॅटर्न, लेहेंगा असो साडी शोभून दिसेल

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल, प्रकरण काय?

Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

SCROLL FOR NEXT