Doctors Assaulted by Patients Family One Seriously Injured Saam
मुंबई/पुणे

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Doctors Assaulted by Patient’s Family, One Seriously Injured: मुंबईतील कूपर रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांकडून ३ डॉक्टरांवर हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी.

Bhagyashree Kamble

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील प्रसिद्ध कूपर रूग्णालयातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रूग्णालयात भयंकर प्रकार घडला. रूग्णांच्या नातेवाईकांनी ३ डॉक्टरांवर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. सध्या डॉक्टर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कूपर मार्डकडून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कूपर रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये गंभीर अवस्थेत असलेल्या रूग्णांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. त्यावेळी संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. मात्र, त्यांनी काहीही विचारणा न करत थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच इतर २ डॉक्टरांनीही मारहाण केली.

अचानक झालेल्या मारहाणीमुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. वैद्यकीय कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. दरम्यान, डॉक्टरांना मारहाण करण्यात आली, तेव्हा रूग्णाचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, त्यापूर्वीच नातेवाईकांनी मारहाण केली, असं डॉक्टरांनी सांगितलं.

य़ा मारहाणीत डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे तात्काळ अतिरिक्त सुरक्षा मागितली आहे. रुग्णालय परिसरात पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु असून हल्लेखोर नातेवाईकांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT