Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: भररस्त्यात तरुणाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, मुंबईमधील भयंकर घटना; VIDEO पाहून नागरिक संतापले

Mumbai Crime: मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये भयंकर घटना घडली. रस्त्यावर एका तरुणाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपीविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

Priya More

मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. भररस्त्यावर एका तरुणाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली. एका तरुणाने हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आणला. त्याने याचा व्हिडीओ काढला. तरुणाने हटकल्यानंतर या तरुणाने कुत्र्याला सोडून दिलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीच्या वैशालीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रात्रीच्या अंधारामध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या आडोशाला बसून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. एका तरुणाने हा सर्व धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्याने या तरुणाला हटकले. तरुणाला पाहून बिथरलेल्या या व्यक्तीने कुत्र्याला सोडून दिलं.

त्यानंतर हा तरुण तिथून उठून निघून गेला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा तरुण व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाकडे रागाने पाहत आहे. त्यानंतर व्हिडीओ काढणारा तरूण या तरुणाला थांब तू तुला पोलिस ठाण्यात नेतो असे म्हणतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अशीच घटना घडली. एका तरुणाने गायीवर दुष्कृत्य केले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ही घटना घडली. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली. आरोपीला पकडत असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT