19 वर्षीय तरुणाचं अपहरण करून जबरदस्तीने जेंडर बदल शस्त्रक्रिया
आरोपींकडून पीडिताला धमक्या देत ब्लॅकमेलिंग, मारहाण
पीडित तरुणाला सूरतला घेऊन जाऊन जबरदस्तीने करण्यात आली सर्जरी
मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 19 वर्षीय बीकॉम विद्यार्थ्याला अपहरण, धमकी, ब्लॅकमेल, मारहाण आणि जबरदस्तीने जेंडर बदल सर्जरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप एका गटावर करण्यात आला आहे. पीडिताने कुरार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मलवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.v
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महाविद्यालयीन तरुणाची ओळख मालवणीतील कावेरी निकममार्फत नेहा खान उर्फ नेहा इप्टे यांच्याशी झाली होती. पीडित तरुणाच्या आरोपानुसार 5 ऑगस्ट रोजी नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्याला घरात बोलावून जेंडर ट्रान्सिशनसाठी दबाव टाकला. नकार दिल्यावर त्याला बंदिस्त करून धमकावण्यात आले आणि अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरू केली.
यानंतर पीडिताकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला तसेच साडी घालून भिक्षा मागण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला. 28 ऑक्टोबर रोजी आरोपींनी त्याला जबरदस्तीने सूरत येथील रुग्णालयात नेऊन वैद्यकीय कागदांवर सही घेऊन अनिच्छेने जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेनंतर पीडिताला मुंबईत आणून त्याच्यावर अमानवीय वागणूक देण्यात आल्याचेही आरोप आहेत. अखेर 4 नोव्हेंबर रोजी तो पळून आईकडे पोहोचला. परंतु दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा त्याचे अपहरण केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याची सुटका झाली.
मालवणी पोलिसांनी नेहा खान, सोहेल खान, भास्कर शेट्टी, कावेरी निकम आणि इतरांविरुद्ध अपहरण, साजिश, जबरदस्ती, ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने वैद्यकीय विकृतीकरणाचे गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.