Shocking Accident in Bhiwandi Saam Tv News
मुंबई/पुणे

खड्ड्यांमुळे डॉक्टरचा मृत्यू; स्कूटीसह खाली पडले, ट्रकनं चिरडलं, नेमकं घडलं काय?

Shocking Accident in Bhiwandi: भिवंडी शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टर नसीम अन्सारी यांचा मृत्यू. स्कूटीचा तोल गेल्याने पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • भिवंडी शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टर नसीम अन्सारी यांचा मृत्यू.

  • स्कूटीचा तोल गेल्याने पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

  • अपघातानंतर नागरिकांनी रस्ता रोखून संताप व्यक्त केला.

  • पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

भिंवडी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्कूटी चालवत असताना डॉक्टरचा तोल गेला. नंतर ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडले. ते ट्रकखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी रोष व्यक्त केला.

नसीम अन्सारी असे डॉक्टरचे नाव आहे. ते भिवंडी शहरातील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी ते भिवंडी‌ शहरातील वंजारपट्टी नाका येथून सिराज हॉस्पिटलजवळून जात होते. या दरम्यान, त्यांचा भीषण रस्ता अपघात घडला. डॉक्टर नसीम अन्सारी हे अॅक्टिव्हा स्कूटीवरून जात होते. रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि चिखलचं साम्राज्य होतं.

खड्ड्यातून वाट काढत जात होते. मात्र, तोल गेला आणि स्कूटीसह खाली पडले. यादरम्यान, त्यांच्या स्कूटीच्या मागून एक ट्रक येत होता. ट्रकचं चाक त्यांच्या अंगावरून गेलं. ट्रकच्या टायरखाली आल्याने ते चिरडले गेले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर पसार झाला. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच डॉक्टर नसीम अन्सारी यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावलं. तसेच  जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर अन्सारी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT