Mashal Election Symbol History  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : मशाल आणि शिवसेनेचं नातं जुनंच; घडविला होता इतिहास

तसं पाहता मशाल हे चिन्ह शिवसेनेला नवीन नाहीये. कारण यापूर्वी शिवसेनेनं मशाल चिन्ह हाती घेऊन इतिहास घडविला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यानंतर ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह देण्यात आलं. आता अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गट भाजप-शिंदे गट युतीविरोधात 'मशाल' हाती घेऊन उतरणार आहे. तसं पाहता मशाल हे चिन्ह शिवसेनेला नवीन नाहीये. कारण यापूर्वी शिवसेनेनं मशाल चिन्ह हाती घेऊन इतिहास घडविला आहे. (Mashal Election Symbol History)

'मशाल' चिन्हांने घडविला होता इतिहास

मशाल आणि शिवसेनेचं नातं हे 37 वर्ष जुनंच आहे. 1985 साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. याच चिन्हाच्या जोरावर बाळासाहेबांनी महापालिकेत शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आणले होते.

छगन भुजबळ यांनीही त्यावेळी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. या चिन्हाच्या जोरावर भुजबळ पुढे शिवसेनेकडून आमदार म्हणूनही निवडून आले होते. महापालिकेत 74 नगरसेवक निवडून आल्यानंतर मशालीने इतिहास घडवत सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे दावे फेटाळून लावत, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक लढवण्यासाठी मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. तर शिंदे गटाला अजून चिन्ह मिळालेलं नाहीये.

याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे हे नाव दिलं तर शिंगे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता पुन्हा यापूर्वीच्या मशाल चिन्हाची चर्चा होत आहे. शिवसेनेने देखील त्यांच्या ट्विटर हॅंडलवर ठाकरे गटाचा लोगो शेअर केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT