Sanjay Shirsat-Sushma Andhare Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare on Sanjay Shirsat: संजय शिरसाट उर्मट, असभ्य आणि असंसदीय माणूस; सुषमा अंधारे भडकल्या

Sushma Andhare vs Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांना क्लीन चिट मिळताच सुषमा अंधारे चांगल्याचं संतापल्या. त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Prachee kulkarni

Sushma Andhare vs Sanjay Shirsat: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, याप्रकरणात पोलिसांनी सिरसाट यांना क्लीन चिट दिली. दरम्यान, क्लीन चिट मिळताच सुषमा अंधारे चांगल्याचं संतापल्या. त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

संजय शिरसाट उर्मट, असंसदीय, असभ्य माणूस आहे. मला अशा लोकांबाबत बोलायचं नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पृथ्वीचा आकार केवढा ज्याचा त्याचा मेंदू एवढा. ज्याचा मेंदू छोटा बक्ष दिया, असा टोलाही त्यांनी संजय शिरसाट यांना लगावला आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, संजय शिरसाट यांना या प्रकरणात क्लीन चिट देणारा कोण? हे मी शोधणार असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून तरी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे देखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले आहे.

'शिंदे गट स्वीकारायचा की नाही, हे ठाकरे ठरवतील'

जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते ठाकरेंकडे परत येतील, असं विधान केलं होतं. यावर सुद्धा सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. शिंदे गट स्वीकारायचा की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील. शिंदे गटातील आमदारांना एखाद्या पक्षात सामील व्हावं लागेल. म्हणूनच ते गट म्हणून दावा करत नाही, ही भाजपची खेळी आहे, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाचे नेत्यांनी आक्षपार्ह विधाने केली तर भाजप तेव्हा हात काढून घेते. मला भाजप नेत्याने शिंदे गटाचा नेत्याबाबत माहिती पाठवली. तो विदर्भातला भाजपचा महत्वाचा पदाधिकारी. ही माहिती मला शिंदे गटाच्या कॅबिनेट मिनिस्टर बद्दल माहिती दिली. भाजपच्या लोकांना शिंदे डोईजड झाले आहेत, असं म्हणत शिंदे गटातील काही नेते मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT