Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : तुम्हाला जर उत्तम शिव्या देता येत असतील तर.., संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक सल्ला

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut vs Eknath Shinde Group : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. गद्दारांना गद्दारच म्हणणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तुम्हाला जर उत्तम शिव्या देता येत असतील तर, त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल आणि भाजपला द्या, असा खोचक सल्लाही त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना दिला आहे.  (Maharashtra Politics News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात शिंदे गट विरुद्ध संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. गुवाहाटी दौऱ्यावरून तसेच ५० खोक्यांवरून संजय राऊत हे वारंवार शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करताहेत. दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा संजय राऊतांवर शाब्दिक हल्ले केले जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी शिंदे गटातील (Eknath Shinde) नेत्यांना गद्दार असं संबोधलं होतं. त्यावर उत्तर शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांवर शेलक्या भाषेत टीका केली होती. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं असता, गद्दारांना गद्दारच म्हणणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर शिंदे गटातील नेत्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्या त्यांनी सर्वात आधी त्या शिव्या छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तसेच भाजप नेत्यांना द्याव्यात, असा खोचक सल्ला राऊतांनी दिला आहे. इतकंच नाही, तर त्यांना तुम्ही शिव्या दिल्या तर आम्ही तुमच्यावर फुलं उधळू, तुमचं महाराष्ट्र कौतुक करेल, असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

'बेळगावमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या'

संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, 'आमचा कानडी बांधवांशी कोणताही वाद नाही. मुंबईमध्ये कन्नड बांधवांसाठी अनेक हॉल्स आहेत, भवनं उभारण्यात आली आहे. आम्ही त्याला कधीही विरोध केला नाही. आमचा वाद नाही पण तो तुम्ही निर्माण करताय. हा जो सीमाभागाचा लढा आहे, तुम्ही गावांवर आता हक्क सांगू लागला आहे. कर्नाटक भवन बांधायला आमचा विरोध नाही. पण ते तुम्ही करणार असाल, तर आम्हालाही बंगळुरू आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या', अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT