Sanjay Raut
Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

तुम्ही शिवलिंग शोधताय पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश ऐकत नाही : संजय राऊत

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : काश्मिरी पंडितांचं (Kashmiri Pandit ) पलायन आणि हत्या याबाबत शिवसेना पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडितांच्या बाजूनं उभी राहील. अशा परिस्थितीत तुम्ही शिवलिंग शोधताय पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही,असे वक्तव्य शिवेसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. मुंबईत आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ( Shivsena Leader Sanjay Raut Latest News )

हे देखील पाहा -

काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्येचे प्रकार वाढू लागले आहे. त्यामुळे हजारो पंडितांनी काश्मीरमधून पलायन सुरू केले आहे. काश्मिरी पंडितांच्या बाजूने महाराष्ट्र ठाम उभा आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याच काश्मिरी पंडितांच्या पलायनावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'काश्मिरी पंडितांचं पलायन आणि हत्या याबाबत शिवसेना पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडितांच्या बाजूनं उभी राहील.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडीतांच्या बाजूनं उभं राहील'.

काश्मीरमध्ये पंडिताचे चालू आहे. त्यांच्या पलायनावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. 'तुम्ही शिवलिंग शोधताय पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काश्मीरची स्थिती नियंत्रणाबाहेर आहे.कधी काश्मीर फाईलचं प्रमोशन होतं, कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतं. मात्र, काश्मिरी पंडीतांच्या दु:खाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, असंही संजय राऊत म्हणाले,

दरम्यान, संजय राऊतांनी शिवसेनेच्या आगामी अयोध्येच्या दौऱ्यावरही भाष्य केलं आहे. 'संध्याकाळी आम्ही अयोद्धेला जात आहोत. मी, एकनाथ शिंदे, वरूण सरदेसाई असे एकूण आम्ही १५ जण अयोद्धेला जात आहोत. १५ जूनच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता आज अयोद्धेला जाणार आहोत. अयोद्धा दौरा हे आमचे राजकीय शक्तीप्रदर्शन नाही. येत्या १५ तारखेला आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू किनारी आरती करतील, असे राऊतांनी सांगितले. तसेच त्यांना औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, औरंगाबाद नामांतराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील'.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT