मुंबई: राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Election) मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून (Shivsena) संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये होते. यावेळी त्यांना ताप आल्याने त्यांनी दौरा मध्येच थांबवला. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची, माहिती त्यांनी ट्विट करुन दिली. कोरोनाची(Corona) लागण झाल्यानंतरही फडणवीस राज्यसभेसाठी अॅक्शनमोड असून, ते आज ऑनलाइन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Devendra Fadnvis Latest News)
काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा नियोजीत लातूर दौरा होता. लातूरमध्ये त्यांनी एक सभा घेऊन पुढे ते सालापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी जाणार होते, पण त्यांना अचानक ताप आल्याने त्यांनी पुढचा दौरा रद्द केला. काल त्यांनी कोरोनाची चाचणी केली, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवर राजकारण सुरू झाले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक (Election) होणार आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी आता देवेंद्र फडणवीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण होऊनही ते आज ऑनलाइन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आज दुपारी चार वाजता भाजपची (BJP) बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील प्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीसाठी भाजपा (BJP)प्रदेश कार्यालयात अश्विनीकुमार वैष्णव, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी भाजप नेते गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. (Devendra Fadnavis Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.