फडणवीस मी परत येईलला तयार आहेत, पण ते होणार नाही - नीलम गोऱ्हे

कंगणा रणौत, नवनीत राणा, नारायण राणे यांना सुरक्षा पुरवता मग कश्मिरी पंडितांना का नाही?
Neelam Gorhe On Devendra Fadnavis
Neelam Gorhe On Devendra FadnavisSaam TV
Published On

औरंगाबाद : 'फडणवीस मी परत येईलला तयार आहेत, पण ते होणार नाही, असा टोला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. त्या आज औरंगाबादमधील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पत्रकारांनी राज्यसभा निवडणुकीबाबच प्रश्न विचारला असता त्यांनी हे वक्तव्य केलं.

त्या पुढे म्हणाल्या, 'जो म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्याचा राजकीय एन्काउंटर करण्याची भाजपची (BJP) निती आहे. आम्हाला माणसं जमविण्यासाठी नववारी नेसुन इव्हेंट करावे लागत नाही. तसंच औरंगाबादच्या नामकरणाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'नामकरण महत्त्वाचे आहे, पण जनतेच्या प्रश्नांची उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भाषणातून पुर्तता होईल. शिवसेनेचे आमदार अभेद्य राहतील अशी अपेक्षा, निवडणूकांमध्ये आम्हाला यश मिळेल.

हे देखील पाहा -

तसंच लवकरात लवकर पाणीप्रश्न सुटावा यासाठी आम्ही बांधिल आहोत, पाणी टंचाई करण्यासाठी काय दंडभेद करावा लागतो, याची आम्हाला जाणीव आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

शिवाय जर जर नामकरणाचा प्रस्ताव आला नाही तर तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांकडून प्रस्ताव पाठवावा, त्यांनी केंद्रामध्ये बैठक घ्यावी, त्यांनी त्याचे श्रेय घ्यावे. तसंच कश्मिरी पंडितांना शस्त्र द्यावी, सुरक्षा देण्यात केंद्र सरकार कमी पडतय. कंगणा राणावत, नवनीत राणा (Navneet Rana) नारायण राणे यांना सुरक्षा पुरवता मग कश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits) का देत नाही? याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी द्यावे असही त्या म्हणाल्या.

तसंच केंद्राने ठरवलं तर मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांच्या मागे ED चौकशी लावतील, फडणवीस मी परत येईलला तयार आहे, पण ते होणार नाही १० तारखेला फेसला कळेल असंही त्या यावेली म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com