Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली; 'सामना'तून शिंदे गटाला चिमटे

मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली, सामना अग्रलेखातून शिंदे गटाला चिमटे

Satish Daud

Shivsena vs Eknath Shinde : आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंगावर आपला दावा असल्याचं म्हटलं आहे. तशी जाहिरातच सरकारने माध्यमांमध्ये दिली आहे. आसाम सरकारच्या या कुरापतीमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून कुरापतीविरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला. तसेच राज्यातील शिंदे सरकारला चिमटे देखील काढण्यात आले आहेत.  (Maharashtra Political News)

महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. त्यांच्या बाता विकासाच्या असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हक्काचे हिरावून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत. देव, धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्राला हतबल करण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आता राज्यातील जनतेलाच शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल, असा संताप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

देशभरात एकूण 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत. त्यातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममधील डाकिनी टेकडीवर वसले आहे, असा जावईशोध आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने या जाहिरातीद्वारा लावला आहे. वास्तविक पुण्याजवळील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आहे, ही खूप जुनी मान्यता आहे. शिवलीलामृत, शिवपुराण आणि इतर मान्यताप्राप्त धार्मिक ग्रंथांत सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत, असं 'सामना'तून मांडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे; कारण या सर्व फुटिरांना आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथे ‘राजाश्रय’ मिळाला होता. ‘काय झाडी, काय हाटील…’ अशी जंगी बडदास्त ठेवली गेली होती. तेथील मुक्कामापासून कामाख्या मंदिरातील ‘विधीं’पर्यंत आसाम सरकारने मिंधे गटाचा खासा पाहुणचार केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही. ‘या पाहुणचाराच्या बदल्यातच भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांना देऊन आला नाहीत ना?’ असा सवालही सामनातून  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला करण्यात आला आहे.

आधी दिल्लीने मिंधे गटाचा स्वाभिमान आणि अभिमान पळवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या हक्काच्या गोष्टींची जी पळवापळवी सुरू झाली आहे ती थांबायलाच तयार नाही. महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेले मोठे प्रकल्प, उद्योग यांच्या नाकासमोरून गुजरातने उघडउघड पळवून नेले. आता आसाम सरकारने यांच्या नाकावर टिच्चून आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर मालकी हक्क सांगितला आहे. मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांची ही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले! आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल. असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT