Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कामटे यांनी राजीनामा दिल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे.
Devendra Fadnavis File Photo
Devendra Fadnavis File PhotoSaam Tv
Published On

Chinchwad By-Election : सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे मैदानात उतरले आहेत. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनिती आखण्यात येत आहे. अशातच पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे.  (Maharashtra Political News)

Devendra Fadnavis File Photo
Rohit Pawar : महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार?, सत्तासंघर्षावर रोहित पवारांचे सूचक ट्वीट, कोर्ट आज काय निर्णय घेणार?

पिंपरी निखल परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नगरसेवक तुषार कामटे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामटे यांनी राजीनामा दिल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी तुषार कामटे यांनी आपल्या नगरसेवक पदाची कारकीर्द पूर्ण होण्याअगोदरच नगरसेवक पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला होता.  (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेत भाजप करत असलेला भ्रष्टाचाराला कंटाळून मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे, असा आरोप तुषार कामटे यांनी केला होता. आता त्यांनी थेट भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, तुषार कामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis File Photo
Eknath Shinde News : डबल इंजिन सरकारला महापालिकांचे एक-एक डबे जोडले जातील, CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दलं आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीत कितीही उमेदवार उभे असले तरी चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमच्याच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर चिंचवड विधानसभा निवडणुकीत मनसेने दिलेला सशर्त पाठिंब्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पाठिंबा हा पाठिंबा असतो त्यात शर्ती नसतात, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीतील प्रचाराची स्थिती जाणून घेतली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com