Uddhav Thackeray, Rasmi Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Rasmi Thackeray, Eknath Shinde Latest News  Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : बंड का केलं? एकनाथ शिंदेंनी रश्मी ठाकरेंना सांगितली ३ कारणं

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉटरिचेबल झाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार, अशा चर्चांना उधाण आलं असतानाच, आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची फोनवरून एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर, त्यांनी शिवसेना आपण हा पवित्रा का घेतला याची कबूली सुद्धा रश्मी ठाकरे यांच्याकडे दिली असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest News)

इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधताना आपण हा पवित्रा का घेतला याची तीन कारणही सांगितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या नाराजीतलं, तसंच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षामधील मतभेद आणि त्यांच्या परिणामुळे शिंदे यांना हा पवित्रा घेतला असल्याची कबूली स्वत: शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांकडे दिली असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Marathi News)

दुसरीकडे, एकनाथ शिंदे हे नाराज होऊन शिवसेना आमदारांसह गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. सध्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ते आज रात्रीपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, हीच बाब लक्षात घेताच शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांच्याशी संपर्कात होते असेही समजते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT