मुंबई : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉटरिचेबल झाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये BJP) प्रवेश करणार अशा चर्चांना उधान आलं असतानाच, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांसह संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)
एकीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यावरून शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेली असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. अशातच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील 30 हून अधिक आमदारांनी राजीनामा दिला तर, महाराष्ट्रात खरोखरच राजकीय भूकंप होऊ शकतो. कारण, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणं म्हणजे शिवसेनेवरची नाराजी आणखी तीव्रपणे व्यक्त करणं. याचाच अर्थ शिवसेनेनं केलेली शिष्टाई परिणामकारक ठरली नाही आणि कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार धोक्यात येऊ शकतं, असं बोललं जात आहे.
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सेनेच्या काही आमदारांसह सूरतला गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)
शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं तसंच फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं तर मला उपमुख्यमंत्री करावं, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेली शिवसेना चांगलीच कात्रीत सापडली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना मध्यस्थी करण्यासाठी सूरतला पाठवले आहे. उद्धव ठाकरेंकडून ही मनधरणी सुरु असतानाच एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार ,अशी माहिती पुढे आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत शिवसेनेला एक प्रस्तावही दिला होता. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा आणि भाजप सोबत सरकार स्थापन करा. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर मला उपमुख्यमंत्री करा असं या प्रस्तावात एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावली असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.