Sada Sarvankar Saam TV
मुंबई/पुणे

Sada Sarvankar News: 'ती बंदूक आमदार सदा सरवणकर यांचीच पण...' पोलिसांनी दिला महत्वाचा अहवाल

गतवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या राड्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळी झाडली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: गतवर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली असून आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली असून हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला आहे. अशा घटनांमुळे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था ठासळत आहे. पोलिसानी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता आता हा अहवाल दिला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताही कमी होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी याबाबत बोलताना दिली आहे.

काय होते हे संपूर्ण प्रकरण....

गेल्यावर्षी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर प्रभादेवी परिसरात ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला होता. सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून राडा झाला त्याठिकाणी आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी फायरिंग केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. यावरुन बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT