Shrikant Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde News : कोरोना बॉडीबॅग ठाण्यात ३५० रुपयांना मिळत असताना मुंबईत ६७०० रुपयांना, खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

Covid Bodybag Scam: आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या १५ वर्षांच्या कार्यकालाचे उत्तर जनतेला द्यावे असे ते म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम होत होते. कोविडमधील मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या ३५० रुपयांना मिळत असताना त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल ६७०० रुपये का मोजत होती, असा प्रश्न शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची ओळख आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी उद्धव ठाकरेंच्या १५ वर्षांच्या कालावधीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.

कोविड काळात एकीकडे माणसे मरत होती व हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते, १५ वर्ष उद्धव ठाकरेंच्या ताव्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळाचे उत्तर जनतेला द्यावे असे ते म्हणाले. आमच्यावर खोके खोके असा आरोप करणाऱ्यांनी कुणाला किती खोके मिळाले हे लवकरच एसआयटीच्या चौकशीतून समोर येईल, हे विसरु नये असा इशारा त्यांनी दिला.

ईडीच्या चौकशीत सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांचे धागेदोरे कुणापर्यंत गेले आहेत हे स्पष्ट होईल असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत सत्ता असताना मराठी माणसांना, शिवसैनिकांना काय मिळाले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी माणसांना मुंबई सोडून ठाणे, कल्याण डोंबिवली जावे लागत आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हेच कारणीभूत आहेत, असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT