Sanjay Raut News  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut on PM Modi : राजाचं फकिरीचं ढोंग उघडं पडतंय; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून PM नरेंद्र मोदींवर निशाणा

Political News : अदानी समूहाच्या मुद्दावरुन संजय राऊत यांना पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

भाजपकडून मुंबईतील इंडियाची बैठकीवरुन नागरिकांचं लक्ष हटवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मुंबईत इंडिया बैठकीवरचे लक्ष उडावे म्हणून दिल्लीतील विशेष संसद अधिवेशनाची घोषणा झाली. त्यामुळे राजकीय गोंधळ उडेल व इंडिया बैठकीच्या बातम्या झाकोळून जातील असे भाजपच्या चाणक्यांना वाटले. तसे काहीच घडले नाही, असं संजय राऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक'मधून म्हटलं आहे.

अदानी समूहाच्या मुद्दावरुन संजय राऊत यांना पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. व्यापारी मित्राच्या खिशात राजा आहे व राजा स्वत:ला फकीर म्हणून मिरवतो. त्या फकिरीचे ढोंग उघडे पडत आहे. गुजरातच्या भूमीवरून जे घाणेरडे राजकारण दोन नेत्यांनी केले, त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही सर्वच धोक्यात आले. महात्मा गांधींची ही भूमी असे सांगायलाही आता जीभ धजावत नाही.

महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी गुजरात सोडून महाराष्ट्रात व नंतर चंपारण्य व दिल्लीत गेले, पण त्यांचे मत पक्के होते. गुजरातच्या व्यापार मंडळात राहून स्वातंत्र्याचा लढा लढता येणार नाही. या मातीत व रक्तात व्यापार आहे. नफा आणि तोटा हे दोनच शब्द येथील लोकांना समजतात. म्हणून गांधीजींनी देशभक्तांची नवी पिढी जागी करण्यासाठी त्यांनी आधी महाराष्ट्राचा व नंतर बिहार, दिल्लीचा रस्ता पकडला. लोकसभा निवडणुकीत गुजरात मोदींच्या मागे पुन्हा राहील असे जे सांगितले जाते ते याचमुळे. व्यापारी प्रजेला व्यापारी राजा मिळाला, पण संपूर्ण देश म्हणजे गुजरातचा व्यापार नाही, असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे. (Political News)

मुंबईचा लचका तोडायचा आहे

मुंबईवर अप्रत्यक्ष कब्जा मिळविण्याचा हा डाव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत. महाराष्ट्रात एक कमजोर सरकार व दुबळा मुख्यमंत्री बसवून मुंबईचा लचका तोडायचा, हे कारस्थान आहे. शिवसेना ते यशस्वी होऊ देणार नाही. प्राणपणाने महाराष्ट्राच्या मुंबईचे रक्षण करू,' असे श्री. उद्धव ठाकरे यांनी बजावले. मोदी सरकारने गेल्या महिन्यात अध्यादेश आणून दिल्लीच्या लोकनियुक्त सरकारला अपंग व गुलाम करून केंद्राचे दास बनवले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.  (Latest Marathi News)

जम्मू-कश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून पाच वर्षे झाली. 370 कलम हटवले म्हणजे काय केले? या संभ्रमात तेथील जनता आजही आहे. तेथे निवडणुका होऊ न देणे ही राज्याच्या जनतेशी प्रतारणा आहे. लडाखची भूमी व मणिपूरची खनिज संपत्ती पंतप्रधान मोदी यांना आपले मित्र गौतम अदानी यांना द्यायची आहे, असा सरळ हल्ला श्री. राहुल गांधी यांनी केला. त्यात आता मुंबईची भर पडली. ईस्ट इंडिया कंपनीने तोंडात बोटे घालावी अशी ही व्यापारी कार्यपद्धती. 'इंडिया' आघाडीस त्या विरोधात लढायचे आहे, असा निर्धार केल्याचंही संजय राऊत यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT