Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut criticize Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: सोमय्यांचे प्रकरण अफजल गुरु आणि कसाब इतकेच भयंकर, संजय राऊतांचा घणाघात

त्यांची आणखीन दहा प्रकरणं आहेत ते मी बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी दिला.

जयश्री मोरे

मुंबई: किरीट सोमय्यांचे प्रकरण अफजल गुरु आणि कसाब इतकेच भयंकर आहे, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी घणाघाती आरोप केला आहे. त्यांची आणखीन दहा प्रकरणं आहेत ते मी बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी दिला.  (Sanjay Raut on Kirit Somaiya)

केंद्र सरकारच्या मदतीने आमचे फोन टॅप - संजय राऊत

"मी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) प्रश्न विचारला की, केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नाही का हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगा. त्यावर ते म्हणाले की मी डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे. तेव्हा मी आमचे फोन टॅप कसे झाले हा मुद्दा मांडला".

"रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या हे आपल्याला माहित आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. आमचे फोन टॅप करुन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी आमचे फोन ऐकण्यात आले. हा आमच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा विषय होता. केंद्र सरकारच्या मदतीने आमचे फोन टॅप झाले. त्यामुळे जबाबासाठी तपास यंत्रणेपुढे जायला माझी काही हरकत नाही", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

58 कोटींचा हिशोब हा किरीट सोमय्यांनी द्यावा - संजय राऊत

"58 कोटींचा हिशोब हा किरीट सोमय्यांनी द्यावा, असं म्हणत संजय राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला. उलटा चोर कोतवाल को डाटें. विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत, तुम्ही सतत 10 दिवस पैसे गोळा केले, 711 खोकी तुम्ही पैशांची भरली आहेत. त्या पैशांचा व्हाईट मनी कसा केला हेही आम्हाला माहितीये. नौटंकी बंद करा. फक्त ओरडून बोललं म्हणजे खरं खोटं होत नाही. तुम्ही त्या पैशांचं काय केलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवताय", असंही राऊत म्हणाले.

"तुम्ही पैसे गोळा करुन ढेकर दिली आहे आणि त्याचा दुर्गंध संपूर्ण मुंबईत येतो आहे आणि जर भारतीय जनता पक्षाचे मोठे लोक या गैरव्यवहाराचे समर्थन करत असतील, तर त्याची देखील काश्मीर फाईल्सप्रमाणे फाईल करावी लागेल, ही नवीन विक्रांत फाईल आहे" असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

"भ्रष्टाचाराचे समर्थन तुम्ही करत आहेत. पण, देशद्रोहाचे समर्थन तुम्ही करु नका, हे किरीट सोमय्यांचे प्रकरण अफजल गुरु आणि कसाब इतकेच भयंकर आहे. इधर उधर की बात मत कर, आपने पैसा जमा किया है, या नही. बस सिम्पल, त्याची आणखीन दहा प्रकरणं आहेत ते मी बाहेर काढणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज तो चोर दिल्लीला गेला आहे. तिथे काहीतरी नौटंकी करणार पण कितीही नौटंकी केली तरी तुमचे वस्त्रहरण झाले आहे", असं संजय राऊत म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT