Shivsena Vs BJP Saam TV
मुंबई/पुणे

...त्यामुळे भाजपनेच मनसेला पत्र पाठवायला सांगितलं असावं; अरविंद सावंतांचा गंभीर आरोप

भाजपकडे ही माणुसकी नाही तो माणुसकीहिन सविधानाहिन संस्कृतीहिन पक्ष आहे - सावंत

Jagdish Patil

निवृत्ती बाबर -

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आली असतानाच भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी केली आहे. याबाबतच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहलं आहे. (Andheri East Assembly By-Election)

आता याच राज ठाकरेंच्या पत्रावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे, शिवाय राज ठाकरे एवढ्या दिवस का गप्प होते असा प्रश्न देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

साम टिव्हीशी बोलताना सावंत (Arvind Sawant) म्हणाले, आज राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण फार उशीर झाला तरिही देर आये दुरुस्त आये म्हणता येईल. पण, शिंदे गटाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होईल असं ज आयोगाला दिलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. मात्र, आता ते निवडणूक लढवतायत का? ते किती खोटं बोलत आहेत. याचं उदाहरण समोर आलं आहे.

एवढंच नव्हे तर ऋतुजा लटकेंचा (Rutuja Latake) राजीनामा मंजूर करताना देखील शिंदे गट आणि भाजपने किती गलीच्छ राजकारण केलं. दबाव नव्हता मग मंजूर करा आदेश का नाही दिले दबाव होता. इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे का शांत होते असा सवाल उपस्थित करत आता भाजपला पराभव होत आहे असं वाटतं आहे. त्यामुळे त्यांनीच आता तुम्ही आम्हाला पत्र पाठवा आणि आम्ही माघार घेता असं मनसेला सांगितलं असेल असा आरोप देखील सावंत यांनी यावेळी केला आहे.

शिवाय कोल्हापूरच्या निवडणुकीत काय झालं शिवसेनेची जागा होती. पण आम्ही जाधव यांच्या पत्नीला आम्ही पाठिंबा दिला आमची जागा असून सोडली. मात्र, भाजपकडे ही माणुसकी नाही भाजप हा माणुसकीहिन सविधानाहिन संस्कृतीहिन पक्ष आहे असं म्हणात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

Kullu Cloudburst Video: कुल्लूमध्ये ढगफुटी; रस्ते खचले, घरं, दुकानं गेली वाहून

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT