रश्मी पुराणिक -
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आली असतानाच या निवडणुकीने वेगळंच वळणं घेतलं आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मनसेकडून भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबतच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहलं आहे. (Andheri East Assembly By-Election)
याच पत्रावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आशिष शेलार (Ashish Shelar) हे राज ठाकरेंना भेटले आणि भाजपच्या (BJP) उमेदवारला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिलं. मात्र, याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. आम्ही उमेदवार घोषित केला आहे.
पाहा व्हिडीओ -
या स्टेजला भूमिका मला घेत येत नाही, पक्षात चर्चा करावी लागेल, मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि चर्चेअंती निर्णय घेऊ, आता घेता येणार नाही असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांना काही काम उरले नाही, मी सामना वाचत नाही, शिवाय हा बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. त्यामुळे त्यावरती प्रतिक्रिया देऊन माझी पातळी खालवणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं?
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आज अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते.
अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आमदार झाल्या तर, रमेश यांच्या आत्म्याला शांती मिळेल. भाजपने ही निवडणूक लढवू नये आणि लटके यांच्या पत्नी आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.