naresh mhaske controversial statement Saam Tv News
मुंबई/पुणे

Naresh Mhaske : 'जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानातून परत आणतोय'; खासदार नरेश म्हस्केंचं वादग्रस्त भाष्य

Naresh Mhaske on Pahalgam Attack : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Prashant Patil

ठाणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत यायचं आहे. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरला गेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त होत आहे. 'शिवसेनेच्यावतीने पर्यटकांना आणण्यात येत आहे. जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत', असं वादग्रस्त वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

'जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता? अहो, ४५ लोक रेल्वेने गेले होते. ते पहलगाममध्ये अडकले. गरीब लोकं, त्यांचा खाण्याचा प्रॉब्लेम होता. एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोकं राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ते रेल्वेने गेली होती. ते घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कपरघोडी म्हणताय?,' असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. नरेश म्हस्के यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत त्यांचा चांगला समाचार घेतला आहे. 'संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वजण दु:खात आहेत, वेगळ्या संवेदनात आहेत तेव्हा सत्ताधाऱ्यांनी भान बाळगलं पाहिजे. मात्र, कायम श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेले लोकं आणि कुरघोड्यांच्या राजकारणात असलेले लोकं, यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की, त्यापुढे त्यांना लोकांच्या भावना आणि संवेदना याबाबत काहीच वाटत नाही. त्यामुळे या लोकांकडून काय अपेक्षा करायच्या? जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत त्यांना तुम्ही विमानात बसवली म्हणजे उपकार केले का तुम्ही?,' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

SCROLL FOR NEXT