MLA Disqualification Case Saam Digital
मुंबई/पुणे

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान विधानसभाध्यक्षांची दमछाक, राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागणार : सूत्र

Shivsena MLA Disqualification Case : विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरला नागपुरात पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान असणार आहे.

प्रविण वाकचौरे

सुनील काळे

Shivsena MLA Disqualification Case :

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण होणे शक्य दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ३१ डिसेंबरच्या डेडलाईनचं पालन करताना विधानसभा अध्यक्षांची दमछाक होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागू शकतात, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर वेगाने सुरु आहे. या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना येणाऱ्या काळाता ओव्हरटाईम करावा लागू शकतो.

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरला नागपुरात पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे अध्यक्षांना दिवसभर अधिवेशनाचं कामकाज आणि सायंकाळी आमदार अपात्रतेची सुनावणी घ्यावी लागणार आहे.

सकाळच्या सत्रात हिवाळी अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे सायंकाळी ४ ते ७ यावेळेत आमदार अपात्रतेची सुनावणी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत सुनावणी आटोपताना अध्यक्षांची तारेवरची कसरत होणार आहे.

तूर्तास उद्यापर्यंत शिंदे गटाच्या वकिलांना उलट साक्ष घेण्याची मुदत आहे. तर १ ते ११ डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील उलट साक्ष घेतील. उद्या आमदार सुनील प्रभू व कार्यालय सचिव विजय जोशी यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे.

१ डिसेंबरपासून शिंदे गटातील पाच आमदार व एका खासदारांची होणार उलट साक्ष होणार आहे. आमदार भरतशेठ गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT