Aaditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

'गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले'; आदित्य ठाकरे यांचा भाजपवर आरोप

'गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Aaditya Thackeray News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमावादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. सीमावादावर प्रतिक्रिया देतना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्यातील उद्योग बाहेर जाण्यावरून भाजपवर टीका केली आहे. 'गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला. (Latest Marathi News)

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील चारकोप भागात शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या मालवणी जत्रोस्तवाला भेट दिली

यावेळी भाजपवर टीका करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, 'सीमावादावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले गेले. तसंच आता कर्नाटकाची निवडणूक लागणार आहे. तिथे आता सध्याच्या सरकारची परिस्थिती स्थिर नसल्याने त्यांना आता गावे आणि जिल्हे पळवायचे आहेत'.

शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात त्यांनी ज्या गद्दारांना पाठिंबा दिला आहे. त्याच्यातूनच आपल्याला कळतंय की, राज्यातून उद्योग निघून चालले आहेत. महाराष्ट्रात कृषिक्षेत्र कोलमडत आहे. कुठेही कृषिक्षेत्राला पाठबळ दिलेले नाही'.

'हे सगळं होत असताना सत्ताधाऱ्यांनी जनतेची काम करावी. गद्दार आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. तरी कुठेही काही झालेलं नाही. महापालिकेचे निविदा रद्द होत आहेत. रस्त्याचे कामे कुठेही होत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

राज्यपालांवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, 'अद्याप महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना पदमुक्त केलेले नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्र प्रेम का अपेक्षित करावं? खासदार उदयनराजे असो किंवा कोणीही असो आंदोलन करायची वेळ कशाला यावी. भाजप किंवा गद्दार सत्ताधाऱ्यांना राज्यापालांप्रति प्रेम आहे का?'

'हे सरकार घटानाबाह्य सरकार आहे. हे सरकार कोलमडून पडेल. हे इमान विकलेल्या लोकांचे सरकार आहे. ज्या लोकांनी स्वत:ला विकून सरकार बनवले आहे, त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल? कोणत्याही उद्योजकाला सरकारप्रति विश्वास राहिला नाही, त्यामुळे उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT