Raj Thackeray In Kokan: कुणी आडवं आलं तर तुडवून पुढे जा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray Order To MNS Workers: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला
Raj Thackeray In Ratnagiri
Raj Thackeray In RatnagiriSaam Tv

Raj Thackeray Latest News: पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा... मी मुंबईतुन वकिलांची फौज उभी करतो. लांजा येथे कार्यकर्तांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्ताना आदेश दिले आहेत. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत. (Ratnagiri Latest News)

Raj Thackeray In Ratnagiri
Bhagat Singh Koshyari News: हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यपालांची उंचलबांगडी होणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मनसे पक्षाच्या बांधणीसाठी राज ठाकरे सध्या राज्यातील अनेक भागात दौरे करत आहे. सध्या त्यांचा कोकण दौरा सुरू आहेत. सोबतच अमित ठाकरेही तरुणाईला आकर्षित करण्यासाठी थेट मैदानात उतरुन तरुणाईला साद घालत आहेत.

अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com