shivsena demands regular water supply saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : डोंबिवली पाठोपाठ कल्याणचा पाणी प्रश्न ऐरणीवर, KDMC वर सेनेच्या नेत्रा उगलेंची धडक

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : डोंबिवली पाठोपाठ कल्याण येथे देखील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पाठोपाठ आता शिवसेना देखील आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. एक तर पाणी येत नाही आणि जर आलं तर दूषित पाणी येतं असे म्हणत शिवसेना शिंदे गटाने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीला आज आठवडाभराचा अल्टिमेटम दिला. (Maharashtra News)

गेल्या वर्षभरापासून कल्याण पश्चिमेकडील ठाणकर पाडा ,बेतूरकर पाडा, मनीषा नगर सह आसपासच्या परिसरात पाणीटंचाईची भेडसावू लागली आहे. महापालिकेच्या नियोजनहीन कारभारामुळे येथील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. या भागात पाणी येत नाही आणि जेव्हा येतं ते पण दूषित येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

आज संतापलेल्या महिलांसह शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी नेत्रा उगले या पालिका मुख्यालयात आले. उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सूनावत पाणी देत नाही, जेव्हा पाणी देता ते दूषित असतं मग बिल कसलं घेता असा सवाल केला.

येत्या आठवड्याभरात जर पाणी समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले यांनी केडीएमसीच्या प्रशासनास दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT