shivsena news  saam tv
मुंबई/पुणे

'आम्ही हरलो म्हणजे तुम्ही...'; निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

शिवसेनेनं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Shivsena News : शिवसेना कुणाची? शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार? की शिवसेनेचं चिन्ह गोठावणार? या प्रश्नाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं.. शिवसेनेने (Shivsena) धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्र सादर केली. मात्र, तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेनं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

आज, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची धनुष्यबाणाबाबत महत्वाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुमारे चार तास बैठक चालली. या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाला अंधेरीच्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही. डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही'. मोदी-शाह, फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण खडकातूनही पुन्हा उगवू',

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या वकीलांची बैठक सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं पर्यायी चिन्ह देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेकडून सोमवारी पर्यायी चिन्ह निवडणूक आयोगाकडे दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: अनैतिक संबंधात नवरा अडसर बनला, घराजवळच मृतदेह गाडला, चित्रपटापेक्षा भयानक घटना

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

देवाभाऊंच्या 'त्या' जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

Dhamaal 4: अजय देवदान, रितेश देशमुख, अर्शद वारसी पुन्हा येणार 'धमाल' करायला; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Maharashtra Live News Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मर्दानी खेळाची परदेशी रंगत

SCROLL FOR NEXT