Sanjay raut news
Sanjay raut news  saam tv
मुंबई/पुणे

Patra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊतांची भूमिका काय ? ईडीच्या वकिलांनी केले धक्कादायक आरोप

सूरज सावंत

Patra Chawl Case News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने काही दिवसांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना देखील ईडीने समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या पत्नींच्या अडचणीत देखील वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आठ तारखेपर्यंत संजय राऊत यांना न्यायालयाने ईडीने (ED) कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. खात्यात कोटयावधी रुपये आले कसे ? या मागचा सूत्रधार कोण आहे याचा ईडी तपास करणार आहे, असे सांगण्यात आलं आहे.

पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट झाले. त्यांनी म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

सदर प्रकारणामध्ये आपण संजय राऊत यांची कोठडी मिळाल्यानंतर ईडीने केलेल्या तपासात वर्षा राऊत यांचे नाव देखील समोर आले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले. या कथित घोटाळ्यात वर्षा राऊत यांची नेमकी भूमिका काय सगळ्याचीच ईडी चौकशी करणार आहे

दरम्यान, प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.

ईडीच्या वकीलांचा आणखी दावा आहे की, अलिबागची जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात थेट आर्थिक फायदा झाला आहे. प्रविण राऊत फक्त नावाला होते. ते संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होते.

मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले आहे का ? संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला का ?राऊताच्या परदेशी दौऱ्याचा खर्च प्रवीण राऊत का व कसे करायचे ? या सर्वांची चौकशी ई़डीकडून करण्यात येऊ शकते.

दरम्यान, या प्रकरणात वर्षा राऊत व संजय राऊत यांच्या बँक खात्यावरून झालेल्या व्यवहाराची चौकशी ईडी करत आहे. ज्या व्यक्तीशी हे व्यवहार झालेले आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच प्रकरणात वर्षा राऊत यांनाही समन्स ईडीकडून समन्स बजावले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT