मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असणाऱ्या सामना (Saamana) या वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदाची सुत्र माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता (Uddhav Thackeray) आपल्या हाती घेतली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाच्या मुख्य संपादक पदाची धुरा ही रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे सोपवली होती. (Uddhav Thackeray will now hold the post of editor-in-chief of Saamna)
मात्र, आता पुन्हा 'सामना'च्या मुख्य संपादक पदाची सूत्र ही उद्धव ठाकरेंनी हातात घेतली आहेत. अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात झालेले सत्तांतर आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी बंड केलेले नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, शिवसेनेत पडलेली फुट आणि ठाकरेंच्या अस्तित्वावरती उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह पुसून काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मैदानात उतरले. निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. तर शिवसेना भवनासह मुंबईमधील शाखांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला जनसंपर्क वाढवला.
सेनेची गाडी रुळावर येत आहे असं दिसतं असतानाच शिवसेनेला पुन्हा एक मोठा धक्का बसला. तो म्हणजे सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (Sanjay Raut) ईडीने केलेली अटक. या सर्व पार्श्वभूमिवरती आता उद्धव ठाकरें यांनीच आपल्या हातात सामनाची सुत्र घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह आल्याचं बोललं जात आहे.
शिवाय या मुखपत्राद्वारे ते आपली भूमिका देखील मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अटकेनंतर ही मोठी घडामोड शिवसेनेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.