shivsena leader sanjay raut slams to bjp and navneet rana Saam TV
मुंबई/पुणे

तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut On Navneet Rana: आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, तर सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे आणि ती सत्ता फक्त खुर्चीची नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे शुक्रवारपासून मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर (Matoshri) हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या राणा (Navneet Rana) दाम्पत्यावर आणि भाजपवर (BJP) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे. सरकार असल्यामुळे आमचे हात नक्की बांधलेले आहेत. मात्र तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं असं राऊत म्हणाले आहेत. (shivsena leader sanjay raut slams to bjp and navneet rana)

हे देखील पाहा -

राऊत म्हणाले की, कुणाच्यातरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसणार तर आम्ही काय शांत बसू काय. आम्हाला शिकवू नका. तम्ही कोण आहात? तुमच्या लायकीत रहा. लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसैनिक तुमच्या घरापर्यंत घुसेल. राष्ट्रपती राजवट लावाण्याच्या धमक्या देत आहात तर लावा. ईडी, सीबीआय लावा, आम्हाला त्रास द्या आम्ही तुम्हाला घाबरत नाही असं राऊत म्हणाले. तसेच शिवसैनिकांवर आता कुणाचा कंट्रोल नाही. गेल्या दोन दिवसांत जे झालं ते फक्त शिवसैनिकांच्या नाही तर पूर्ण जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. मी सध्या नागपूरातून हे पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हालाही घरं आहेत हे लक्षात ठेवा. केंद्रीय पोलिस बळाचा वापर करुन आमच्या घरात घुसत असाल तर, आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, आमचे शिवसैनिक सक्षम आहे. आमचे शिवसैनिक सदैव मारायला आणि मरायला तयार असतात असंही राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले की, सरकार असल्यामुळे आमचे हात नक्की बांधलेले आहेत. तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं. राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाही. सत्तेची आम्हाला परवा नाही, त्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, तर सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे आणि ती सत्ता फक्त खुर्चीची नाही. शिवनेना हीच एक पॉवर आहे, तुम्हाला त्याचा चटका घ्यायचा असेल तर तर घेऊ शकता. जे होतंय ते होऊन जाऊ द्या, एकदाच होऊन जाऊ द्या. कालपर्यंत हिंदुत्वावर टीका हल्ले करणारे हे बंटी-बबली यांना मोठं करण्याचं काम भाजपने आणि नवहिंदुत्ववादी ओबीसींनी केलंय, त्यात त्यांचेच हात जळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांना पुरुन उरल्या. केरळमध्ये त्यांना नीट श्वासही घेता येत नाही. शिवसेनेला पुरुन उरण्यासाठी भाजपला सात जन्म घ्यावे लागतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT