मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावले आहेत.
येत्या 1 डिसेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने बजावले आहेत. 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना हे समन्स बजावले आहेत. मला अटक करण्यासाठीचं हे कारस्थान असल्याचं संजय राऊतांना म्हटलं आहे. (Latest Marathi News)
माझ्या भाषणात प्रक्षोभक काय होतं मला कळत नाही. सीमावर्ती भागातील बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी मी बोललो होतो. 2018 साली केलेल्या भाषणाची दखल घेत त्यांनी मला आज समन्स बजावलं आहे. याचा अर्थ असा आहे की मी तिथे कोर्टात जावं. माझ्यावर तिथे हल्ला व्हावा किंवा मला तिथे गेल्यावर अटक करायची आणि बेळगावच्या तरुंगात डांबायचं, असं कारस्थान रचलं जात आहे. याची माहिती मला दोन दिवसांपासून मिळत होती, असंही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या लोकांवर कारवाई करुन त्यांच्यावर हल्ले करण्याचं कारस्थान रचलं जात आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे. सीमाबांधवांच्या हितासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.सीमाबांधवांसाठी शिवसेनेनं अनेक हुतात्मे दिलेत, मी देखील व्हायला तयार असल्याचं राऊतांनी म्हटलं.
बाळासाहेबांनी सीमाप्रश्नासाठी 3 महिने तुरुंगवास भोगला आहे. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्कीच बेळगावला जाईल. मी स्वत: कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिकांसोबत बेळगावला जाईल आणि तिथे अटक करुन घेईल. मला तुरुंगात किती दिवस ठेवायचं ठेवा. मात्र राजकीय मतभेत बाजूला ठेवत सीमाभागातील प्रश्नांबाबत सर्वांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे. कर्नाटक सरकार आपली कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.